Skip to main content

Posts

मुळव्याध समज आणि गैरसमज

                मुळव्याध समज आणि गैरसमज मुळव्याध म्हणजे अवघड जागेचे दुखणे असाच उल्लेख केला जातो. मी नेहमी निरीक्षण करतो तेंव्हा असे लक्षात येते ज्या व्यक्तीला गुद प्रदेशी काही आजार असेल तर तो बोलत नाही लपवून ठेवतो, इतरांना सांगायला लाजतो. त्यामुळे तो लवकर डॉक्टरांकडे जात नाही परिणाम स्वरूप त्याच्या आजारात वाढ होते.              दुसरा भाग असा आहे कि गुदप्रदेशी वेदना झाल्या म्हणजे मुळव्याध झाले असा गैरसमज आपल्या समाजात दिसून येतो. गुदभागी दुखणे हे लक्षण फिशर, भगंदर, छोटासा गळू यामुळे हि होतात. मूळ  मुद्दा असा आहे कि ती जागा स्वतःला दिसत नाही व दुसरे कुणाला दाखवण्याची लाज वाटते त्यामुळे त्या जागी काय झाले आहे हे लक्षात येते नाही.                                                                        पूर्वी पेक्षा मुळव्याध या आज...