मुळव्याधाचा आभास - फिशर गुदभागी काही तरी त्रास होतोय. शौचाला गेल्यावर कापल्या सारख्या वेदना, आग होते, रक्त पडत आहे. हि लक्षणे जाणवली कि आपण मुळव्याध हा आजार झाला असे ठरवून टाकतो परंतु मुळव्याधाच्या लक्षणांशी साधर्म्य असणारा व मुळव्याधी पासून अगदी भिन्न असणारा फिशर हा आजार हिवाळ्यात ज्या प्रमाणे ओठ फाटतात वा चिरा पडतात तसे उष्णता वाढल्याने वा कडक मलप्रवृत्ती झाल्याने गुदभागी त्वचा फाटते वा चीर पडते त्याला फिशर असे म्हणतात याचे आयुर्वेद ग्रंथात 'परिकर्तिका' या नावाने वर्णन आहे. कर्तनवत वेदना - कापल्या प्रमाणे वेदना होणे हे याचे प्रमुख लक्षण. फिशर हा आजार 95% रुग्णांमध्ये जीवनशैलीतील बदल व औषधोपचाराने बरा होतो. अगदीच फिशर या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्या फिशर मध्ये पू साठून भगंदर या आजारास निमंत्रण दिले जाते. म्हणजे सोप्पा आजार अवघड होऊन बसतो. फिशर होण्याची कारणे 1) बद्धकोष्ठता - ज्या रुग्णांना पोट साफ होत नाही शौचास जोर करावा लागतो वा कडक मलप्रवृत्ती असते. पोट साफ न झाल्याने रुग्ण शौचास जोर करत राहतो व त्यामुळे गुदभागी त्वचा फाटते व ...