Skip to main content

मुळव्याधाचा आभास - फिशर

मुळव्याधाचा आभास - फिशर 

गुदभागी काही तरी त्रास होतोय. शौचाला गेल्यावर कापल्या सारख्या वेदना, आग होते, रक्त पडत आहे. हि लक्षणे जाणवली कि आपण मुळव्याध हा आजार झाला असे ठरवून टाकतो परंतु मुळव्याधाच्या लक्षणांशी साधर्म्य असणारा व मुळव्याधी पासून अगदी भिन्न असणारा फिशर हा आजार 
हिवाळ्यात ज्या प्रमाणे ओठ फाटतात वा चिरा पडतात तसे उष्णता वाढल्याने वा कडक मलप्रवृत्ती झाल्याने गुदभागी त्वचा फाटते वा चीर पडते त्याला फिशर असे म्हणतात 
याचे आयुर्वेद ग्रंथात 'परिकर्तिका' या नावाने वर्णन आहे. कर्तनवत वेदना - कापल्या प्रमाणे वेदना होणे हे याचे प्रमुख लक्षण. 
फिशर हा आजार 95% रुग्णांमध्ये जीवनशैलीतील बदल व औषधोपचाराने बरा होतो. अगदीच फिशर या आजाराकडे दुर्लक्ष केल्यास त्या फिशर मध्ये पू साठून भगंदर या आजारास निमंत्रण दिले जाते. म्हणजे सोप्पा आजार अवघड होऊन बसतो. 
फिशर होण्याची कारणे 
1) बद्धकोष्ठता - ज्या रुग्णांना पोट साफ होत नाही शौचास जोर करावा लागतो वा कडक मलप्रवृत्ती असते. पोट साफ न झाल्याने रुग्ण शौचास जोर करत राहतो व त्यामुळे गुदभागी त्वचा फाटते व फिशर तयार होते किंवा मलप्रवृत्ती कडक झाली तर त्या  कडकपणामुळे त्वचेला घासून जखम होते म्हणजे फिशर होते. 
2) शारीरिक उष्णता वाढल्यामुळे - काही रुग्णानांची प्रकृती अशी असते कि काही उष्ण गुणधर्माचे पदार्थ सेवन केले कि शरीरात उष्णता वाढते. त्यामुळे गुदभागी जखमा होतात. 
3) प्रसूतीनंतर - प्रसूतीनंतर फिशर हा आजार खुप प्रमाणात पाहायला मिळतो. फिशर असूनही स्त्रियांना मुळव्याधाचा भास होत राहतो कारण लक्षणे समान आहेत. 
4) शारीरिक आजार - कोलायटिस, सिफिलिस, क्रॉहन डिसिज या आजारांमध्ये फिशर हा उप आजार म्हणून येतो. 
पुढील भागात फिशरची लक्षणे, पथ्य, उपचार यावर चर्चा करूयात. 
              धन्यवाद !
डॉ. प्रविण चाळक 
BAMS, FIKC,  Reg No. I 34340 A1
ममता मुळव्याध क्लिनिक, आळेफाटा / पिंपळवंडी 
website - https://www.mamatapileclinic.com/

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुळव्याध समज आणि गैरसमज

                मुळव्याध समज आणि गैरसमज मुळव्याध म्हणजे अवघड जागेचे दुखणे असाच उल्लेख केला जातो. मी नेहमी निरीक्षण करतो तेंव्हा असे लक्षात येते ज्या व्यक्तीला गुद प्रदेशी काही आजार असेल तर तो बोलत नाही लपवून ठेवतो, इतरांना सांगायला लाजतो. त्यामुळे तो लवकर डॉक्टरांकडे जात नाही परिणाम स्वरूप त्याच्या आजारात वाढ होते.              दुसरा भाग असा आहे कि गुदप्रदेशी वेदना झाल्या म्हणजे मुळव्याध झाले असा गैरसमज आपल्या समाजात दिसून येतो. गुदभागी दुखणे हे लक्षण फिशर, भगंदर, छोटासा गळू यामुळे हि होतात. मूळ  मुद्दा असा आहे कि ती जागा स्वतःला दिसत नाही व दुसरे कुणाला दाखवण्याची लाज वाटते त्यामुळे त्या जागी काय झाले आहे हे लक्षात येते नाही.                                                                        पूर्वी पेक्षा मुळव्याध या आज...

Is ragi helpful for recovery after piles surgery?

Ragi is good source of calcium, it contains fibers also but not that much enough.  Post piles surgery one thing is very important that your bowl motion should be smooth and for that you need to take high fiber diet . If stool become hard it become painful and recovery time increase.  Fibers plays main role to keep your stool soft. And ragi doesn't have rich fibre so it wil not help you to reduce recovery time.  Take care Dr. Pravin Chalak  No moe piles Offer of month Constipation Piles meaning and myth